पत्नीचे दुसऱ्याशी संबंध ठरले खूनास कारणीभुत

काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या!!!

पोलिसाची कारवाई कौतुकास्पद!! आरोपीस पोलीस कोठडी

दोडामार्ग | सुहास देसाई : पत्नीने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवू नये याबाबत वारंवार समजावून देखील पत्नी ऐकत नसल्याने पतीने रागाच्या भरात त्याच्या साथीदाराच्या मदतीने एका कारमध्ये ओढणीने पत्नीचा गळा आवळून खून केला. घोटगेवाडी भटवाडी येथील पुलाखाली तिचा मृतदेह टाकून मृत महिलेची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आणि ल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९ वा. च्या सुमारास उघडकीस आली आहे. हा विशिता विनोद नाईक (३० वर्षे, रा. वास्को गोवा असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती विनोद मनोहर नाईक (४० वर्षे, मूळ राहणार बेलबाय, वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट, म्हापसा-गोवा) व त्याचा साथीदार ऋतुराज श्रावण इंगवले (४५ वर्षे, मूळ राहणार चंदगड, जिल्हा कोल्हापूर व सध्या राहणार चारीवाडी म्हापसा) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेने दोडामार्ग तालुका हादरला आहे. विशेष म्हणजे दोडामार्ग पोलिसांनी अवघ्या पाच तासातच आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी ,घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्या खाली अज्ञात महिलेचा चेहरा विद्रुप केलेला मृतदेह तेथील ग्रामस्थ दिनू मणेरीकर यांना दिसला त्यांनी याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो याना दिल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबतची कल्पना दिली .लागलीच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी , सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर ,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे आदींनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली व तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.महिलेच्या पेहरावावरून सदरची महिला गोव्यातील असावी असा अंदाज व्यक्त करीत गोव्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कोणी महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंद आहे का ? यदृष्टीने पोलीसांनी तपास सुरू केला असता म्हापसा पोलीस ठाण्यात विशिता विनोद नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या प्रियकराने केली असल्याचे समजले.त्यानुसार तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेत चौकशी केली असता पोलिसांनी केलेल्या वर्णनानुसार तो मृतदेह विशिताचाच असल्याचा अंदाज तिच्या प्रियकराने वर्तवित तिचा पती विनोद याच्यावर संशय व्यक्त केला.लागलीच पोलिसांनी विनोद राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याची चौकशी केली असता तो देत असलेली माहिती विसंगत असल्याचे आढळून आले अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.आपले सन २०१५ साली विशिताशी लग्न झाले.त्यांनतर दोन वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. मात्र सन २०२०ला विशीताचे तिच्या माहेरच्या गावातीलच एका प्रियकराशी अनैतिक संबंध असल्याचे समजले.तिथपासून ती माझ्यापासून विभक्त राहत होती. दोघांच्याही घटस्फोटापर्यंत प्रकरण आले होते.सुरुवातीला विशीतानेच घटस्फोट मागितला होता मात्र नंतर तिने आपणास घटस्पोट नको असल्याचे न्यायालयात सांगितले होते.ती विभक्त राहत असली तरी ती मला भेटत असे यादरम्यान तिला तिचे प्रियकराशी असलेले संबंध कायमचे संपविण्याबाबत समज दिली मात्र ती ऐकत नसल्याने गोड बोलून तिला दोडामार्गमध्ये आणून नंतर घोटगेवाडी त नेऊन आपण आपल्या मित्राच्या मदतीने सोमवारी रात्री १ वा.च्या सुमारास विशीताचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.