28-year-old dies after falling from mango tree in Bhilare Aini
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील भिलारे गावातील खोंडेवाडी येथील २८ वर्षीय जितेश बाळाराम जाबरे हा तरुण आंब्याच्या झाडावरून आंबे काढण्यासाठी चढला होता. झाडाच्या फांदीवरून पाय घसरल्याने झाडावरून खाली पडुन गंभीर दुखापत होऊन मृत्युमुखी पडला ही घटना मंगळवारी घडली. जाबरे या तरुणास उपचारार्थ कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता. येथील वैद्यकीय अधिका-यांनी तो मृत पावल्याचे घोषित केले.








