जिल्हास्तरीय आंतरशालेय गायन स्पर्धेत काळे विद्यालयाच्या कुमारी मुक्ता बापट हिचा तृतीय क्रमांक

 

 

चिपळूण ( प्रतिनिधी ): कै. पांडुरंग सिताराम लघाटे संगीत कक्षाच्या वतीने दिनांक 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेत लहान गटात (सहावी ते आठवी) आर.सी. काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुरामची विद्यार्थिनी कु . मुक्ता संजय बापट हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

कै. पांडुरंग सिताराम लघाटे संगीत कक्षाच्या वतीने मागजन इंग्लिश स्कूल, माखजन येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी मुक्ता संजय बापट हिने सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीतून तिची निवड होऊन अंतिम फेरी करिता ती दाखल झाली होती. काल झालेल्या या स्पर्धेत जिल्हास्तरावर तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

 

याप्रसंगी राजाभाऊ शेंबेकर, अनिरुद्ध निकम व इतर मान्यवरांच्या हस्ते मुक्ता बापट हिचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

मुक्ता बापट ही विद्यार्थिनी गायन, अभिनय आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात सातत्याने यश संपादन करीत आहे. त्याबद्दल तिचे भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्त्रबुद्धे , सरचिटणीस सुनील गमरे व सर्व संचालक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक मुरसिद्ध पडवळे, सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.