चिपळूणमधील शिरगाव विद्यालयाच्या माजी विध्यार्थीनी १० वी २००३ च्या माजी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमधील शिरगाव विद्यालय शिरगाव इयत्ता १० वी २००३ च्या बॅचच्या ६७ जणांनी आज एकत्र येत शिरगांव पंचक्रोशीमधील महाकाली मंदिर कुंभार्ली, श्री रामवरदायनी देवी गजमल पिंपळी आणि मुंढेगाव, येथे झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत पर्यावरण संतुलन व्हावे, यासाठी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले.
यावेळी ॲड. सुरेश खेडेकर यांनी बोलताना सांगितले की, सध्या जागतिक तापमान वाढीचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे, त्यामुळे पर्यावरण संतुलन रहावे यासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे. हे लक्षात आले असता नुसते झाडे लावणे हे मर्यादित न ठेवता ती जास्तीत जास्त कशी जगतील याचीही उपाययोजना केली आहे. सदर वृक्षारोपण करताना जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि सावली देणारी झाडे लावली गेली. सदर वृक्षारोपण शिरगाव विद्यालय शिरगांवचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री बिद्रीकोठीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यापुढेही जास्तीत जास्त झाडे लावण्याचा मानस या मुलांचा आहे. कार्यक्रमासाठी भरीव कामगिरी मिलिंद कुंभार, विशाल कदम, निलेश मेस्त्री, विजय सुतार, महेश ताम्हणकर आणि अमोल ताम्हणकर यांनी केले. या उपक्रमासाठी कुंभार्ली तीन गावचे भाई शिंदे, संदीप कोलगे, किसन पवार, सुरेश गुरव, वैभव पवार तसेच मुंढे गावातील मयूर खेतले, सखाराम गायकवाड, बळीराम गुजर, सुनिल शिंदे, राजेंद्र खेतले, दिपक खेतले, श्रीराम सावंत, श्याम खेतले, ग्रामसेवक मुंढे तसेच तसेच पिंपळी गावाचे ग्रामस्थ विजय तांबट, प्रमोद झुजम, संतोष गुरव. आणि युवा किर्तनकार प्रज्ञाताई ताम्हणकर आणि इ. सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते वृक्षारोपण करत त्यांनी या विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या.