In a house burglary in Ottawane, a thief made away with Rs 21,000 cash
ओटवणे | प्रतिनीधी : ओटवणे देवुळवाडी येथिल राजन बापू गावकर यांच्या राहत्या घरात चोराने घुसून सुमारे २१हजाराची रोकड लंपास केली. बुधवारी ब्राह्मण देवस्थानचा वार्षिक उत्सव असल्याने रात्री ९.३० च्या दरम्यान राजन गावकर व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी शेरवाळवाडी येथे गेले असता ही संधी साधून चोरट्याने लोखंडी सळीच्या साहाय्याने लॉक तोडून आतील कपाटातील रोकड लंपास केले. या ठिकाणी मोठ्या किमतीचे मोबाइल देखील होते माञ चोरट्यांनी मोबाईल चोरले नसून रोकडीवरच डल्ला मारला रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी दाखल होत पाहणी केली यावेळी हवालदार महेश कदम, प्रसाद कदम , कॉन्स्टेबल भोवर ,गजानन मेस्त्री सह पोलिस पाटील लक्ष्मण गावकर आदी उपस्थित होते.










