रत्नागिरी ः प्रतिनिधी
आपल्या बहिणीच्या आणि दिराच्या लग्नाला सहकार्य केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून पतीने पत्नीला लाटण्याने आणि हातांनी बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास धनजीनाका येथे घडली.
अंजार बशीर हकिम (30,रा.धनजानाका,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी फिर्यादी पत्नीची बहिण आणि तिच्या दिराने पळून जाउन लग्न केले. या लग्नाला फिर्यादीचा विरोध होता. तसेच या लग्नाला आपल्या पतीने सहकार्य केले म्हणून तिने पतीला“तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावली तशी माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावायची आहे का” असे विचारले. या गोष्टीचा राग आल्याने संशयित पती अंजाने घरातील किचनमधील लाकडी लाटणे आणून पत्नीच्या उजव्या हाताच्या दंडावर,डाव्या कानावर जोराने मारले. त्यानंतर तेच लाटणे तिच्या उजव्या कानावर माल्याने तिच्या कानातून रक्तस्त्राव होउ लागला एवढ्यावरही न थांबता संशयिताने पत्नीला हातांनीही बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा ज्ार माझ्या भावाच्या लग्नाला विरोध केलास तर तुला ठार मारुन टाकिन अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.










