वालावलकर रुग्णालयात हातांच्या अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया शिबिर

 

चिपळूण (प्रतिनिधी) : भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात ता. ४ व ता. ५ जानेवारी रोजी वालावलकर रुग्णालयात हातांच्या अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
वालावलकर रुग्णालयात इंग्लंड येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. रघुनंदन कानविंदे हे रुग्णावर उपचार करणार आहेत.

डॉ. कानविंदे हे इंग्लंड येथील बंगर युनिव्हर्सिटी मध्ये गेली तीस वर्षे सेवा देत आहेत. आता मात्र ते कोकणवासीयांसाठी दर शुक्रवार ते रविवार डेरवण रुग्णालयात सेवा देणार आहेत. ज्या रुग्णांना हाताच्या संधी वातामुळे बोटे वाकडी झालेली आहेत, ज्यांच्या हाताच्या बोटातून मुंग्या येत आहेत, ज्या रुग्णांना हाताच्या हाडांना गाठी आहेत, ज्या रुग्णांच्या मनगटाला वेदना होत आहेत, ज्या रुग्णांना हाताच्या मनगटाची हाडे, तळव्याची हाडे, बोटांची हाडे यांना फ्रॅक्चर झालेले आहे, ज्या रुग्णांना स्लिप फिंगर आहे अशा सर्व रुग्णांनी वालावलकर रुग्णालयातील ओपीडी विभागातील अस्थिरोग ओपीडी नंबर ४ मध्ये शस्त्रक्रिया शिबिरापूर्वी येऊन तपासणी करून घ्यावी.

सदर शिबिरास डॉ. रघुनंदन कानविंदे (एम. एस. ऑर्थो, एफ. आर. सी. एस ) हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रघुनंदन कानविंदे हे गेली ३० वर्षे इंग्लंड येथील वेस्ल्स शहरात प्रॅक्टिस करत होते. ते हातावरील अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वालावलकर रुग्णालयात रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया उपचारासाठी उपलब्ध असतात.

सदर शिबिरासाठी हातावरील शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभिजीत वाहेगावकर उपस्थित राहणार आहेत. डॉ. वाहेगावकर यांनी मेयो क्लिनिक अमेरिका येथून हाताच्या शस्त्रक्रियेमध्ये फेलोशिप केलेली आहे. ते गेली १५ वर्षे पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत आहेत. ते महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत.

मुंबई येथील एम.जी.एम. मेडिकल कॉलेजचे ऑर्थोपेडिक प्रोफेसर व युनिट इन्चार्ज
डॉ. अशोक घोडके हे देखील या शस्त्रक्रिया शिबिरास उपलब्ध असणार आहेत. तसेच मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रशांत कांबळे हे सुद्धा शिबिरास उपस्थित राहणार आहेत.

कोकण विभागातील हाताचे अस्थिरोग असलेल्या रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा. शस्त्रक्रिया शिबिरापूर्वी रुग्णांनी रुग्णालयात येऊन शस्त्रक्रिया पूर्व तपासणी एक्स रे, सी. टी.स्कॅन किंवा एम.आर.आय इत्यादी चाचण्या करून घ्याव्यात. रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे. असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.