चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षपदी श्री. उमेश धोंडीराम सकपाळ यांनी दणदणीत विजय मिळवत चिपळूणच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. विविध प्रभागांतून विजयी झालेल्या उमेदवारांमुळे नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
नगराध्यक्षपदासह सर्व १४ प्रभागांतील विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : नगराध्यक्ष – श्री. उमेश धोंडीराम सकपाळ. प्रभाग क्रमांक १ जागा अ – नाखुदा मिसबा अजगर, जागा ब – जुळे उदय विठ्ठल. प्रभाग क्रमांक २ जागा अ – सौ. सफा दिलबर गोटे, जागा ब – सरगुरोह साजिद हनीफ खान. प्रभाग क्रमांक ३ जागा अ – दांडेकर रूपाली राकेश, जागा ब – बुरटे प्रमोद सुभाष. प्रभाग क्रमांक ४ जागा अ – अजय पांडुरंग भालेकर, जागा ब – वैशाली विलास कदम. प्रभाग क्रमांक ५ जागा अ – कोवळे निहार हेमंत, जागा ब – नसरीन खडस. प्रभाग क्रमांक ६ जागा अ – निमकर वैशाली मधुकर, जागा ब – गोताड संजय चंद्रकांत. प्रभाग क्रमांक ७ जागा अ – भिसे संदीप अशोक, जागा ब – हर्षली संदेश पवार. प्रभाग क्रमांक ८ जागा अ – वांगडे साईनाथ नजीर, जागा ब – योगेश जगन्नाथ पवार. प्रभाग क्रमांक ९ जागा अ – अंजली सतीश कदम, जागा ब – मोदी शशिकांत श्रीकांत. प्रभाग क्रमांक १० जागा अ – देवळेकर रसिका रत्नदीप, जागा ब – विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के. प्रभाग क्रमांक ११ जागा अ – नीलम सीताराम जाधव, जागा ब – अंकुश आवले. प्रभाग क्रमांक १२ जागा अ – उमा उदय देसाई, जागा ब – पिसे शुभम दयानंद. प्रभाग क्रमांक १३ जागा अ – गणेश आग्रे, जागा ब – महाडिक पल्लवी मोहन. प्रभाग क्रमांक १४ जागा अ – शिंदे कांचन सुमित, जागा ब – मिथिलेश विकी नरळकर. निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण असून, विकासाभिमुख व पारदर्शक प्रशासनाच्या अपेक्षा नागरिकांनी नव्या नगरपरिषदेकडून व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना शिंदे गट : ९
भाजप : ७
शिवसेना ठाकरे गट : ५
काँग्रेस : ३
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : २













