महायुतीतर्फे कॅबिनेट मंत्री व आमदारांचा होणारा नागरी सत्कार पुढे ढकलला

भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : महायुतीतर्फे सावंतवाडी येथे बुधवार २५ रोजी होऊ घातलेला कॅबिनेटमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांचा नागरी सत्कार कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली असून नव्या वर्षात लवकरच हा भव्य नागरी सत्कार होणार असल्याचे देखील महेश सारंग यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोंसले शिव उद्यान येथे बुधवार २५ डिसेंबर रोजी महायुतीतर्फे कॅबिनेट मंत्री ना. नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर तसेच कुडाळचे आमदार निलेश राणे यांचा नागरी सत्कार महायुतीतर्फे आयोजित करण्यात आला होता. मात्र, बुधवारी मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण बैठक असल्यामुळे हा कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन दिवस व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली.