टप्प्याटप्प्याने आधुनिक क्रीडासुविधा उभारणार तरुणांना खेळाची संधी; आरोग्य व पर्यटनाला चालना

देवगड : देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीत मिनी क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात सुरू करून पुढील टप्प्यांत अधिक सुविधा वाढवून शहराला साजेसा आधुनिक क्रीडासंकुल उभारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या क्रीडांगणामुळे स्थानिक तरुण-तरुणींना विविध खेळांची संधी मिळून त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धात्मक क्षमता वाढणार आहे. कणकवलीप्रमाणेच दर्जेदार क्रीडासंकुल उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सूचनांनुसार पुढील सुविधा टप्प्याटप्प्याने जोडल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी आमदार अजित गोगटे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सभापती बुवा तारी, तनवी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, योगेश चांदोसकर, योगेश पाटकर, दया पाटील, विवेक खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.