सक्शन व्हॅन उपक्रमाचा शुभारंभ
नव्या प्रकल्पांमुळे देवगडचा सर्वांगीण विकास वेगाने

देवगड : देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीत नमो गार्डन प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. शहराच्या विकासासाठी नमो गार्डनसारखे प्रकल्प महत्त्वाचे असून नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच वेळी शहराच्या स्वच्छतेसाठी सक्शन व्हॅन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे सांडपाणी व्यवस्थापन सुधारून स्वच्छता अधिक प्रभावी होणार आहे. पवनचक्की गार्डनप्रमाणे या प्रकल्पामुळेही स्थानिक व्यापार व हॉटेल व्यवसायाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी आमदार अजित गोगटे, राजा भुजबळ, बुवा तारी, तनवी चांदोस्कर, शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, योगेश चांदोसकर, योगेश पाटकर, दया पाटील, विवेक खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.












