प्रत्यक्ष कृती व मार्गदर्शनातून वेंगुर्ले च्या खर्डेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर संपन्न…

 

वेंगुर्ले :|प्रतिनिधी : बॅ. बाळासाहेब खर्डेकर महावि‌द्यालय वेंगुर्ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीर विकसित भारत हि संकल्पना होऊन यशस्वी केले.
तुळस गावातील खरीवाडी येथे शिबिराचे उदघाटन तुळस गावाच्या सरपंच सौ. रश्मी परब यांच्या हस्ते झाले. या उदघाटन प्रसंगी तुळस गावाचे उ‌द्योजक आणि प्रिंटिंग व्यवसाय स्वतःचा नावलौकिक मिळविलेले श्री. दादासाहेब परुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. निवासी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सायबर सुरक्षा आणि नशामुक्त भारत या विषयावर वेंगुर्ला पोलीस स्टेशन च्या रंजिता चौहान यांनी आजच्या तरुण पिढीने मोबाईलचा वापर अभ्यासासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी करावा गैरप्रकाराकडे वळू नये, हे जेवढे सहज सोपे आहे त्यापेक्षा ते घातक आहे. नशा मुक्त युवकच भारतीय व्यवस्था आधुनिक करू शकतात. आपण आपली जबाबदारी ओळखून कोणत्याही नशेपासून दूर राहून आपले व आपल्या देशाचे भवितव्य घडवावे असा संदेश पोलीस सावी पाटील मॅडम यांनी दिला.

 

शिबिराच्या तिसऱ्या दिवशी ‘निरोगी जगण्याची कला’ या विषयी डॉ. मिलन सावंत यांनी युवकांनी आहार विहार आणि व्यायाम यांचं समन्वय घडवून आणावा. आपल्या प्रदेशाला आवश्यक असलेल्या आहार तरुणांनी घेऊन निरोगी आयुष्य जगावे, निरोगी तरुण देशाच्या विकासाला हातभार लावू शकतो. शिबिराच्या चौथ्या दिवशी विकसित भारतासाठी युवकांनी काय करणे अपेक्षित आहे हुशार बु‌द्धिवान आणि सक्षम तरुणांनी आपण जिथे ज्ञान संपादन केले त्याच देशासाठी आपले कार्य करावे ह्यासाठी त्यांनी आपल्या देशातील महान व्यक्तीचा दाखला दिला. वैभव खानोलकर यांनी तरुणांची आपली जबाबदारी ओळखावी असे आवाहन केले. शिबिराच्या पाचव्या दिवशी श्री. प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तगट आणि त्याची सविस्तर माहिती सांगतानाच रक्तदान करण्याची आवश्यकता सांगितली देशाची आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी रक्तदान करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाची आहे हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. सहाव्या दिवशी आजच्या स्पर्धेच्या युगात आपली श्रेष्ठता हि स्पर्धेतूनच सिद्ध करावी लागते यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशा प्रकारे करायची आणि ती तयारी करत असतानाही एखा‌द्या वेळी यश मिळाले नसले तरी निराश न होता पुन्हा जोमाने तयारी करून यशस्वी होता येते हे स्वतःच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांची माहिती दिली.

 

 

सात दिवस चाललेल्या या श्रमसंस्कार शिबिरात श्रमाचे महत्व कळावे यासाठी तुळस गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आणि तुळस गावचे ग्रामदैवत जैतीर मंदिर परिसर स्वछ केला. तुळस गावातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यासाठी श्रमदानातून दोन बंधारे पूर्ण केले. या शिबिरातून महाविद्‌यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव व्हावी आणि विकसित भारतासाठी आपणही जबाबदारीने वागले पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्फत हि यंत्रणा सतत कार्यरत असते.
या शिबिरासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, संस्थेच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेटुन कॉऊंसिल मेंबर दौलतराव देसाई, महावि‌द्यालयाचे प्राचार्य एम. बी. चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. डॉ. पी. आर. गावडे, डॉ. के. आर. कांबळे व डॉ. डी. एस. पाटील मॅडम तर सदस्य म्हणून प्रा. एल. बी. नैताम, प्रा. नरगछे सर, डॉ. सुनील भिसे. प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.