राजीवडा येथे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील राजीवडा येथे गळफास घेणार्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मासुम अजगर दर्वेश (24, रा. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
मासुम अजगर याने 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राजीवडा येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले. गळफास घेतल्याने प्रकृती गंभीर असलेल्या मासुम याच्यावर अतिदक्षता विभाग येथे उपचार करण्यात येत होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मासुम याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.