घाणेखुंट शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा भेट

खेड(प्रतिनिधी) घाणेखुंट जय भवानी मित्रमंडळाच्या ‘एक वाढदिवस शाळेसाठी’ संकल्पनेतून रोट्रॅक्ट क्लबचे कोकण विभागीय अध्यक्ष व जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिकेत काते, उपाध्यक्ष कमलेश पवार यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कोतवली हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट दिला.
यावेळी मुख्याध्यापक तांबे, सरपंच संतोष ठसाळे, लोटे रोट्रॅक्ट अध्यक्ष मनिष वाडकर, सचिव प्रणय काते, खजिनदार मकरंद सोलकर, विक्रम पवार, विराज खेडेकर, तारक तांबे,अजिंक्य रोकडे उपस्थित होते.