खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील कुळवंडी-जांभुळगाव येथील श्री कुलस्वामिनी सालुबाई सोमय्या देवीचा त्रैवार्षिक पांजी उत्सव १ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून रात्री १० वाजता बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
उत्सवात पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह बहुसंख्य भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जांभुळगाव ग्रामस्थ मुंबई-पुणे मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे