खेडमध्ये २, ३ रोजी तालुकास्तर क्रीडा स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत २ व ३ जानेवारी रोजी खेड नं.१ प्राथमिक शाळेत तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल.
२ रोजी मोठागट सांघिक, लहानगट वैयक्तिक स्पर्धा,
सायंकाळी ४ वा. बक्षीस वितरण होईल. ३ रोजी लहानगट सांघिक, मोठागट वैयक्तिक स्पर्धा, सायंकाळी ४ वा. बक्षीस वितरण होईल. याप्रसंगी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक विकास अधिकारी विजय करपे, गटशिक्षणाधिकारी
विजय बाईत यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.