खेड (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या येथील शाखेच्या अध्यक्षपदी दिवाकर प्रभू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्राहक पंचायतीच्या बैठकीत नवी
कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके
यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत निवडण्यात आलेली नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- कोषाध्यक्ष-सचिन मोरे, अजित तटकरे, संघटनमंत्री राजश्री पाटणे, सल्लागार इक्बाल फकी, तालुका सचिव विजय येरुणकर, जिल्हा सदस्य दिनकर चव्हाण यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा चाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.










