श्री जयंती देवी मंडळ पळसंबचे समाजभान!

मसूरे | झुंजार पेडणेकर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक पळसंब शाळा नंबर १.ची शैक्षणिक सहल देवगड येथे जात आहे. त्याचं औचित्य साधून श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने मुलांच्या खाऊ साठी रोख चार हजार रुपये शिक्षक वर्गाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत, सेक्रेटरी तथा माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर आणि मंडळाचे आजीव सभासद श्री गिरीधर पुजारे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सहलीला शुभेच्छा देऊन शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. शिक्षक वर्गाने मंडळाचे आभार मानले.