मिरकरवाडा येथे बोट मालकावर तांडेलाचा जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

Fatal attack by Tandela on boat owner at Mirkarwada; Death during treatment

रत्नागिरी ः प्रतिनिधी 

काही दिवसांपूर्वी शहरातील मिरकरवाडा समिना जेटी येथे किरकोळ कारणातून लोखडी रॉडने मारहाण करण्यात आलेल्या बोट मालकाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.याप्रकरणी त्याला मारहाण करणाऱ्या विरोधात भादवी कलम 302 अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरणप्पा हंचालप्पा होसेगिरी (35,रा.निट्टाली येलबुर्गा जि.कोप्पल,कर्नाटक) असे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तांडेलाचे नाव आहे.ही घटना शनिवार 6 मे रोजी सायंकाळी 4.30 वा घडली होती. त्यानुसार मृत्यू झालेले बोट मालक आपल्या दुर्गा प्रसाद बोट नं (आयएनडी-एमएच-04-एमएम-4544) हिच्या नालीला डिंगणीतून कलर करण्याचे काम करत होते.तेव्हा बाजु असलेल्या भराडी प्रसाद बोट नं (आयएनडी-एमएच-04-एमएम-3723) या बोटीचा त्यांना त्रास होत होता.

त्यामुळे त्यांनी त्या बोटीची पांग सैल करुन बोट मागे हटवली होती.ही बाब शरणप्पा होसेगिरीला समजताच त्याला राग आला.या रागाच्या भरात त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत आपल्या बोटीवरी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारहाण करुन दुखापत केली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शरणप्पा विरोधात भादंवि कायदा कलम 324,504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  दरम्यान, गंभीर जखमी बोट मालकाला प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्या डोक्यावर 10 टाके घालण्यात आले होते. अधिक उपचारांसाठी त्याच रात्री त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संशयित शरणप्पा होसेगिरी विरोधात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.