चौके सरपंचपदी शिवप्रसाद चौकेकर मोठ्या मताधिक्याने विजयी 

मतदारांचे मानले आभार 

 चौके l प्रतिनिधी :– मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत रिक्त सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

 

चौके ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार शिवप्रसाद चौकेकर व अशोक चौकेकर या दोघांनी उमेदवारी दाखल करून एकमेकांसमोर लढत दिली होती. मंगळवारी पार पडलेल्या मतदानात गावातील 1082 मतदारांपैकी 606 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुधवारी सकाळी मालवण तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या मतमोजणीत तिन्ही प्रभागात शिवप्रसाद चौकेकर यांना मोठे मताधिक्य मिळाले. एकूण झालेल्या 606 मतदानापैकी शिवप्रसाद चौकेकर यांना 490 मते मिळाली तर पराभूत उमेदवार अशोक चौकेकर यांना फक्त 95 मते मिळाली. एकूण मतदानात 21नोटा मते प्राप्त झाली.

 

निकालानंतर शिवप्रसाद चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल सहकार्य करणाऱ्या चौके ग्रामस्थांचे आभार मानले व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. विजयानंतर शिवप्रसाद चौकेकर यांनी चौके सम्यकनगर येथील समाजमंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.विजयानंतर चौके बाजारपेठ व समाजमंदिर येथे फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.