A bundle of copper wire and a thief’s sledgehammer to the pieces
तालुक्यातील वाडीलिंबू येथील घटना
चोरट्याने लांबवलेल्या मुद्देमालाची किंमत ५६ हजार रुपये
लांजा (प्रतिनिधी) तांब्याच्या वायरचे एक बंडल आणि दोन तुकडे असा सुमारे ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना लांजा तालुक्यातील वाडीलिंबू येथे दिनांक १० ते ११ मे या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी ११ मे रोजी रात्री उशिरा लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास दत्ताराम पावसकर (वय ३८, राहणार पावस) यांचा लांजा तालुक्यातील वाडीलिंबू येथे चिरेखाण व्यवसाय आहे. वाडीलिंबू येथे २६ हजार रुपये किमतीची सहा एम एम गोलाईची थ्री कॉलरची डबल कोटेड तांब्याच्या वायरचे एक बंडल तसेच याच तांब्याच्या वायरचे ३० हजार रुपये किमतीचे १५० मीटर लांबीचे दोन तुकडे हे अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत .हा प्रकार दिनांक १०मे रोजी रात्र १० ते ११ मे रोजी सायंकाळी ६ यादरम्याने वाडीलिंबू येथे घडला..
चिरेखाणीवरील मशीनला जोडलेल्या केबल कोणत्यातरी हत्याराने करून करून नेल्या. ही बाब मालक विश्वास पावसकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी ११ मे रोजी रात्री लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करत आहेत.











