तांदुळावर व छोट्या सुपारीवर साकारले श्री देव वेतोबाचे चित्र

शिरोडा येथील चित्रकार श्रीराम वारखंडकर यांची कलाकृती

वेंगुर्ले : दाजी नाईक
आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वाढदिवस 25 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून शिरोडा येथील प्रसिद्ध चित्रकार श्रीराम वारखंडकर यांनी एका तांदळावर व छोट्या सुपारीवर श्री देव वेतोबाचे चित्र साकारून आपली कला देवाच्या चरणी अर्पण केली आहे.
चित्रकार श्रीराम वारखंडकर यांनी साकारलेली सुंदर अशी ही दोन्ही चित्रे सद्या सर्वांचं आकर्षण ठरत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक चित्र साकारली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी बाटलीवर काढलेले आरवली येथील प्रसिद्ध श्री वेतोबा देवाचे चित्र ही सर्वांची वाह वाह मिळऊन गेल होत.