देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीची दांडी समुद्र किनारी उभारणी

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी जेटी ठरणार महत्वपूर्ण

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्र किनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाची ठरणार आहे.

यां फ्लोटिंग जेटी उभारणी बाबत आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे तसेच राज्य शासनाचे भाजपा महिला शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांनी स्थानिकांच्या वतीने आभार मानले आहेत. ही जेटी पर्यटन वाढीसाठी महत्वाची ठरेलं असेही त्यांनी सांगितले.

मालवणात मोठया संख्येने पर्यटक येतात. मागील डिसेंबर महिन्यात एक लाख पेक्षा जास्त पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. मालवण बंदर जेटी येथून प्रवासी बोटीने पर्यटक किल्ल्यावर जातात. त्याच धर्तीवर दांडी येथील फ्लोटिंग जेटीचा वापर करून प्रवासी बोटीने पर्यटकांना किल्यावर जाता येणार आहे. अशी माहिती बंदर अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळ सिंधुदुर्ग प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगल मुगले, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, उपअभियंता दीपक पेटकर, शाखा अभियंता परेश शिंदे, प्रवीण शिंदे, मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांसह शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद हुले, माजी नगरसेवक पंकज सादये, दामोदर तोडणकर, भाजपा कुडाळ मालवण मच्छिमार आघाडी अध्यक्ष नारायण धुरी, भाऊ मोर्जे, संदीप मालंडकर, भाजपा महिला शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर, शिवसेना महिला उपाजिल्हा प्रमुख निलम शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मंदार लुडबे, सुमित सावंत, निषय पालेकर, निनाद बादेकर, स्नेहल पराडकर, मिनल परब, मेघनाद धुरी, संतोष केळूसकर, विठोबा केळूसकर, रुपेश प्रभू यांसह मच्छिमार बांधव, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

बंधारा कम रस्ता व्हावा

दांडी चौकचार मंदिर ते मोरेश्वर किनारी बंधारा कम रस्ता व्हावा. यां मागणी बाबाबत नारायण धुरी व स्थानिक नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. याबाबत निश्चितच प्रयत्नशील असल्याचे आ. निलेश राणे यांनी सांगितले.