मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यासाठी ना. उदय सामंत दिल्लीत

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे आज महाराष्टाचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.

या बैठकीत केंद्रीय मंत्री महोदयांशी संवाद साधल्यानंतर पुढील एका तासात अधिसूचना निघेल, असा विश्वास ना. सामंत ह्यांनी व्यक्त केला. या बैठकीला सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळे, प्रदीप ढवळ उपस्थित होते.