रत्नागिरी आयटीआय येथे 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन

रत्नागिरी:- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिन “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील युवकांच्या विविध गुणांना तसचे कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी या संस्थेतून व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या व यशस्वी उद्योजक म्हणून नावरूपास आलेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रथम गौरव करण्यात येणार आहे.

 

 

यावेळी यशस्वी उद्योजकांच्या माध्यमातून संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगार आणि नेतृत्व विकास याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सन २०२४-२५ मधील संस्थेतील क्रीडा स्पर्धा, तंत्र प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थी व पालक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य, एस.जी.कोतवडेकर यांनी केले आहे.