आडेलीतील डॉ. अनंत प्रभूआजगावकर यांच्या कामगिरीचे ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ मद्ये नोंद

लाल भेंडीच १८ फूट ५ इंच उंच वाढविले झाड

वेंगुर्ले : दाजी नाईक :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगावं गावचे सुपुत्र तसेच सध्या वास्तव्यास आडेली गावामध्ये असलेले डॉ. अनंत (अण्णा ) दिगंबर प्रभू आजगावकर यांनी लाल भेंडीच झाड त्यांनी १८ फूट ५ इंच उंच करून नवीन विक्रम प्रस्थापित केला यांच्या नव्या संशोधनासाठी ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ (worldwide Book Of Record) मध्ये नोंद झाली आहे.

डॉ. अनंत (अण्णा) दिगंबर प्रभू आजगावकर यांची अजून एका नावीन्यपूर्ण विक्रमाची नोंद’ वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली आहे. प्रगतशील शेतकरी प्रभूआजगावकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.