लांजा (प्रतिनिधी )तालुक्यातील रुण येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत लांजा तालुक्यातील श्री नवलाई बापेरे या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
श्री अचलेश्वर क्रिकेट क्लब रुण आयोजित भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा रुण येथे नुकतीच पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रिडा प्रेमीना थरार अनुभवायला मिळाला. स्पर्धेतील
अंतिम सामन्यात राजापूर धोपेश्वर हा संघ विजेता ठरला तर अचलेश्वर रुण हा संघ उपविजेता ठरला आणि तृतीय विजेता श्री नवलाई बापेरे हा संघ ठरला. या सर्व विजयी संघांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा लांजा रुण येथे झाली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक नवलाई बापेरे या संघाचा खेळाडू नितेश गुरव याला देण्यात आले.











