रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन प्रगती’; आता तक्रारीच्या तपासाची माहिती मिळणार थेट व्हॉट्सॲपवर!

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या विविध तक्रारींचे पुढे काय झाले व आपण दिलेल्या तक्रारीचा पुढे तपास कसा होत आहे याबाबत तक्रारदाराला माहिती देणे सुलभ करण्याच्या उद्देशाने ‌‘मिशन प्रगती‌’ हा विशेष लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने हा विशेष लोकाभिमुख उपक्रम 10 जुलै 2025 पासून अंमलात आणला आहे.
या मिशन अंतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व एफआयआर संदर्भात तक्रादारांना-फिर्यादींना तपासाची सद्यस्थिती व्हॉटसॲप व एसएमएस च्या माध्यमातून थेट कळवण्यात येते. या ‌‘मिशन प्रगती‌’ अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 1,450 फिर्यादींना रत्नागिरी पोलिस दलामार्फत 4,508 संदेश हे व्हॉटॲप व एसएमएसच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे,आरोपींना अटक केल्याची माहिती, आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,2023 अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे. अथवा गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्यात आलेली आहे व तपासातील महत्वाच्या टप्प्यांबाबत अद्ययावत माहिती या ‌‘मिशन प्रगती‌’ अंतर्गत व्हॉटॲप व एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. या मिशनचे कामकाम हे पोलिस अधिक्षक कार्यालयांतर्गत नेमण्यात आलेल्या 2 पोलिस अंमलदारांमार्फत करण्यात येत आहे.
पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने नागरिक-केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता,कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन,प्रोजेक्ट व डिजिटल ॲप्लिकेशन्स सुरु केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अनेकवेळा नागरिकांनी दाखल केलेल्या आपल्या तक्रारी अथवा एफआयआर चे पुढे काय झाले. त्या तक्रारींचा तपास पुढे कुठपर्यंत पोहचला आहे. कार्य कार्यवाही झाली आहे, या बद्दल ते अनभिज्ञ असतात व त्याबद्दल त्यांना पूढे अधिक माहिती मिळत नाही. जेवढ्या एमआयआर जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्यास आहेत किंवा दाखल होत आहेत व व एफआयआर दाखल झाल्यानंतर आपल्या दिलेल्या तक्रारीचा तपास पुढे कसा होत आहे,किंवा तपास कसा पुढे सरकत आहे,काय कार्यवाही झाली आहे,याची माहिती तक्रारदारास वेळेवत मिळत नाही. व त्यासाठी बऱ्याचवेळा तक्रारदाराला-फिर्यादीला संबंधित पोलिस ठाणे येथे जावे लागते व वारंवार पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात अनावश्यक त्रास सहन करावा लागतो.
हा होणारा त्रास टाळण्यासाठी तसेच आपल्या दिल्या तक्रारींच्या तपासाची पारदर्शक व वेळेवर माहिती मिळावी तसेच तपास पुढे कसा होत आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलिस दलाने ‌‘मिशन प्रगती‌’ हा उपक्रम सुरु केला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील सर्व तक्रारदारांना-फिर्यादींना आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांनी ‌‘मिशन प्रगती‌’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सेवांचा लाभ घ्यावा. तसेच पाठवण्यात येणारे व्हॉटॲप व एसएमएस संदेश हे केवळ त्यांच्या दाखल तक्रारीबद्दल गुन्ह्याच्या तपासाबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती देणे आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या तक्रारी प्रभावी, पारदर्शक व वेळेत मार्गी लावण्यासाठी कटिबध्द आहे. तसेच ‌‘मिशन प्रगती‌’ या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथ्ावा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.