रत्नागिरी | प्रतिनिधी
जगात भारत मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनवणे आणि किनाऱ्याची सुरक्षितता मजबूत करणे हि आमची प्राथमिकता असून त्यादृष्टीनेच माझे खाते काम करेल. यात कोणत्याही अवैध गोष्टीना थारा नसेल. हे खाते मला पळवायचे आहेत, त्यामुळे यापुढे या खात्यातील कामकाजात बदल निश्चित दिसेल अशा स्पष्ट भाषेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी आपल्या कामकाजाची पद्धत पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधीत खात्याच्या आढावा बैठकीची माहिती प्रथम दिली. जगात चीन आणि इंडोनेशिया हे दोन देश मत्स्य उत्पादनात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे मत्स्य उत्पादन वाढवून भारताला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनवताना त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असावा या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभागाचा आढावा घेतला. एलईडी फिशिंग आणि अवैध पर्ससीन मासेमारी हि मत्स्य उत्पादन आणि त्यातून शासनाला मिळणाऱ्या महसुलावर परिणाम करते. त्यामुळे त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बंदर विकास करताना शासन विविध योजना राबवते आणि पैसा खर्च करते. या योजनांचा उपयोग गरीब मच्छीमारांना व्हावा हा उद्देश असतो. मात्र अनेकदा एकाच परवान्यावर अनेक बोटी मासेमारी करताना दिसतात. नियम धुडकावून लावले जातात. मात्र आता यापुढे असे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कोणतीही अवैध गोष्ट घडणार नाही यासाठी लक्ष ठेवले जाईल. अधिकाऱ्यांनि आता मानसिकता बदलावी यासाठी त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असून कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ना. नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
तसेच सागरी सुरक्षा ही अग्रणी असून त्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नामदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देश विरोधी गोष्टींसाठी बंदरांचा वापर केला जात असल्याची माहिती समोर पुढे येते. मात्र किनारपट्टी सुरक्षा हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं विषय असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अवैध बांधकामे हटवली जातील. याबाबत अधिकार्यांना सूचना करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. किनारपट्टीवर जिहादच्या नावाखाली होणाऱ्या अनधिकृत व्यवहाराला आळा बसेल. लँडिंग पॉईंट्स वर होणाऱ्या अवैध हालचालीवरही लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. सुक्षिततेच्या दृष्टीनेच रत्नागिरीला सध्या एक गस्ती नौका आहे. मात्र आता नव्या स्टीलच्या गस्ती नौका देण्यात येणार आहेत. ड्रोनचा वापर उत्तमरीत्या सुरू असून कार्यवाही सुरू आहेत असे ते म्हणाले. त्यामुळे हे खात चालवताना पारदर्शकता, शिस्त आणि उत्पादन वाढ या दृष्टीने काम केलं जाणार आहे. प्रत्येक खात्याला तीन महिन्यांचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. अवैध रेती उत्खनन होत आहे, त्याबद्दलची माहिती घेण्यात येईल, चुकीच्या पद्धतीने परवाने दिले गेले असतील तर त्याची छाननी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. किनारपट्टी स्वच्छतेबाबत सुद्धा सूचना करण्यात आले असून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कार्यकाळात जस हे खात सांभाळल होत तसच याहीवेळी या खात्याचं नाव चांगलं व्हावं यासाठी काम केलं जाईल असे ते म्हणाले.
रत्नागिरीत सापडलेले बेकायदेशीर बांगलादेशी याबाबत बोलताना ना. राणे म्हणाले की बांगलादेशी आणि रोहिंगे हे जिथे असतात तिथे अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे त्यांच्यामुळे देशाला धोका आहे त्यांची या देशातून हकलपट्टी करायची अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आणि जर त्यांना स्थानिक माणसे मदत करत असतील तर त्यांनाही एकच विमानात बसवून बांग्लादेशाला पाठवू असा टोला यावेळी ना. राणे यांनी लगावला.
बसरा स्टार या मिऱ्यावर गेली चार वर्ष पडून असलेल्या महाकाय बोटीबाबत सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. जो मुसलमान देश, देशाचा ध्वज, आमचे सण उत्सवांना मानत नाही, गोमातेला मातेचा दर्जा देत नाही तो मुसलमान आमच्या दृष्टीने जिहादी मानसिकतेच असून त्यांना या देशात जागा नाही. पण जे मुसलमान देशाला, देशाच्या ध्वजाला, आमच्या गोमातेला माता मानतात, आमच्या सण उत्सवाचा सन्मान करतात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला कायदा मानतात ते आमचे मुसलमान आहेत अशी स्पष्ट भूमिका ना. नितेश राणे यांनी यावेळी मांडली.












