मुणगे हायस्कुलचे चित्रकला परीक्षेत 100 % यश!

मसूरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत अनन्या गावकर, समीक्षा हिंदळेकर, जान्हवी मुणगेकर यांनी ए श्रेणी तर किमया सावंत, संस्कृती सारंग यांनी ब श्रेणी प्राप्त केली.

 

 

अद्वैत अभ्यंकर, मनस्वी आचरेकर, शमिका जाधव, दक्षेश मांजरेकर, संदेश माळकर, आर्या पटवर्धन, मंदिरा परब यांना सी श्रेणी प्राप्त झाली आहे. तर इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत अनुराधा कदम, मृगाक्षी हिर्लेकर यांनी ए श्रेणी तर सुहानी लब्दे, साक्षी मुणगेकर, सोहम हिर्लेकर, श्रावणी माटवकर यांनी बी श्रेणी तर अश्विनी परब हिने तृतीय श्रेणी प्राप्त केली आहे. सर्व विध्यार्थ्यांना कलाशिक्षिका सौ. गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.