सावंतवाडी : एका परप्रांतीय तरुणांकडून लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली असल्याची तक्रार कुडाळ तालुक्यातील एका युवतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा दाखल केली आहे. संबंधित तरुण आता आपल्याशी लग्न करण्यास नकार देत असल्याचे तिने या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू आहे.









