राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या आडीवरे (वाडापेठ) या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ सोहळा रविवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थीतीत आयोजित करण्यात आला आहे.
महिलांनी पुढाकार घेवून महिलांसाठी चालविलेली ही पतपेढी असून पतपेढीने आपल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडये येथील पहिल्या शाखेनंतर सागरी महामार्गावरील आडिवरे येथे दुसरी शाखा निर्माण केली आहे.
आडिवरे वाडापेठ येथील सुप्रसिध्द श्री महाकाली मंदिर भक्त निवास नजीक हळदणकर कॉप्लेक्स, गाळा नं. ४ येथे ही शाखा सुरू होत असून तीचा शुभारंभ पतपसंस्थेच्या संस्थापिका श्रीमती अनिता अरविंद अभ्यंकर यांच्या हस्ते होणार आहे.
पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी डॉ. सोपान शिंदे, सहा. निबंधक, सहकारी संस्था राजापूर अविनाश इंगळे, राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिवगण, बँक ऑफ इंडिया आडिवरे शाखाधिकारी किशोर पांडा, आयसीआयसीआय बँक राजापूर व्यवस्थापक श्रृतीका शिंदे, जागा मालक रजनीकांत हळदणकर आदी उपस्थीत राहणार आहेत.
यावेळी सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंदातर्फे करण्यात आले आहे.










