दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
आचरा | अर्जुन बापर्डेकर : बाल गोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी यांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार २७व२८ जानेवारी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवारी २७ जानेवारी रोजी मंडळाच्या सभागृहांमध्ये रक्तदान शिबिर संध्याकाळी पाच वाजता मुंबई येथील नयन निकम यांच्या उपस्थितीत आचरा मर्यादित होम मिनिस्टर स्पर्धा, रात्री नऊ वाजता मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम. २८ जानेवारी रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी पाच वाजता सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सत् शिष्य दशरथ शिरसाट मुंबई यांचा ज्ञान प्रबोधन व संगीत हरिपाठ, सायंकाळी सहा वाजता बाळ गोपाळ भजन मंडळ बुवा मंदा आचरेकर यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी सात वाजता रवींद्र गुरव यांचे सुश्राव्य भजन, दहा वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचे श्री काल हस्तिश्वर हा ट्रिकसीन युक्त महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन बाळ गोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी यांनी केले आहे.











