कांदळगाव येथे ‘वाचन संकल्प उपक्रम!

मसूरे | झुंजार पेडणेकर : मुलांची व नागरिकांची वाचन संस्कृती टिकून राहावी व वृद्धिंगत व्हावी या हेतूने सर्व शासनमान्य ग्रंथालयामध्ये
वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम साजरा करण्यात यावा या शासनाच्या सूचनेनुसार श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगाव या ग्रंथालयामध्ये वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. प्राथमिक गटामध्ये जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नंबर एक चे सर्व विद्यार्थी व माध्यमिक गटांमध्ये ओझर विद्या मंदिर कांदळगाव चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक निवडून त्यांना पारितोषिके देण्यात आली. उर्वरित सर्वांना सहभागानिमित्त शालोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. याप्रसंगी ग्रंथालयाचे कार्यवाह श्री प्रवीण पारकर, खजिनदार श्री गजानन सुर्वे, सदस्य श्री मंगेश कदम, आर पी बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना उमेश कोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नं.१ च्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मेतर, ग्रंथपाल सौ साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री महेश साळकर, सौ रेश्मा मंगेश कदम आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
गट क्रमांक १ इयत्ता १ली ते ३री:
प्रथम क्रमांक कुमारी हृदया नारायण मिस्त्री द्वितीय क्रमांक सात्विक विद्याधर राणे तृतीय क्रमांक मनस्वी रोहन राणे,
गट क्रमांक २- इयत्ता ४थी ते ५वी:
प्रथम क्रमांक ईश्वरी महेश परब, द्वितीय क्रमांक रुई रामचंद्र गुरव, तृतीय क्रमांक गंबाजी दिगंबर परब.
माध्यमिक गट- इयत्ता ६वी ते १०वी
प्रथम क्रमांक कुमारी संचिता संदेश परब, द्वितीय क्रमांक अमृता गणेश बागवे, तृतीय क्रमांक श्रमिक जीवन कांदळगावकर, उत्तेजनार्थ रिद्धी राकेश कदम.