रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोळंबी संवर्धन केंद्र कोलथरे, दापोली येथे कार्यानुभव प्रशिक्षण

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव रत्नागिरीच्या तृतीय वर्षाच्या ७ विद्यार्थ्यांसाठी ‘ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंग’ या विषयांतर्गत विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. श्रद्धा अनगोळकर, यांच्या मालकीच्या कोळंबी संवर्धन केंद्र, एस. एस. डीस्ट्रीब्यूटर्स, कोलथरे, दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यानुभव प्रशिक्षणामध्ये कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णूकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

या कार्यानुभव प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी तलावात कोळंबीचे संवर्धन, तलावाचे डिझाईन, लागणारी वायुविजन यंत्रणा, पाण्याचे मापदंड, कोळंबी आरोग्य व्यवस्थापन व इतर उपकरणे हाताळणे आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग याचे सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत.
सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी एस. एस. डीस्ट्रीब्यूटर्स चे अधिकारी कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम संस्थेचे प्राचार्य/सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.