पोकलेन मशीन पुलावरून कोसळली नदीत

वैभववाडी सुखनदी पुलावरील घटना 

जुने पुल पाडत असताना घडला अपघात 

वैभववाडी l प्रतिनिधी :   वैभववाडी शहरानजीक असलेला सुख नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन नदीत कोसळला. या अपघातात चालक बालंबाल बचावला आहे.

तरळे – कोल्हापूर मार्गाचे रस्ता रुंदीकरणचे काम गेले वर्षभर चालू आहे. वैभववाडी शहरालगत असलेल्या सुख व शांती नदीवरील पूल नव्याने बांधण्यात येत आहेत. शांती नदीवरील पूलाचे काम सुरू झाले आहे. सुख नदीवरील जुने पूल आज पोकलेन मशीनच्या सहाय्याने पाडण्यात येत होते. पुल पाडत असताना सायंकाळी ३ वाजता पोकलेन नदीत कोसळला. या दुर्घटनेत चालक बालंबाल बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठेकेदार व अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले आहेत.