राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची जिल्हा पत्रकार भवनाला भेट.
पत्रकार भवन खूप सुंदर झालेले आहे ते अजून सुंदर ठेवण्यासाठी आपलं सहकार्य लाभेल अशी दिली ग्वाही
सिंधुदुर्गनगरी :
राज्यात कुठेही नाही असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पत्रकार भवन झालेले आहे.हे पत्रकार भवन खूप सुंदर आहे ते अजून अद्यावत आणि तंत्रज्ञानाने युक्त असे झाले पाहिजे आणि नीट नीटके करायला पाहिजे त्यासाठी आपलं सहकारी राहील अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली नामदार आशिष शेलारे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील अध्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर.उपाध्यक्ष संतोष राऊळ ,खजिनदार संतोष सावंत,महेश सरनाईक,राजन नाईक,अमित खोत,सुहास देसाई,काका करंदीकर,गणेश जे,लवू म्हाडेश्वर आदींसह पत्रकार उपस्थित होते.
या वेळी ना.शेलार यांचा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सुहास देसाई यांना राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला.त्यांचा ना शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी गणेश जेठे यांनी पत्रकारांच्या समस्यांबाबतचे प्रश्न ना शेलार यांच्या समोर मांडले.तर अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पत्रकार भवनातील कामंबांत चे विषय मांडले.या वेळी ना शेलार यांनी पत्रकार भावनाचे कौतुक करतानाच हे पत्रकार होऊन आधुनिक तंत्रज्ञाना च्या माध्यमातून अजून चांगले व्हावे यासाठी आपले सहकार्य राहील असे आश्वासित केले.











