वैभववाडीतील जेष्ठ व्यापारी, भाजपा पदाधिकारी रत्नाकर कदम यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन 

वैभववाडी प्रतिनिधी :       वैभववाडी बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी, भाजपा पदाधिकारी रत्नाकर कदम यांनी रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट पोलिसांकडे सुपुर्द केले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व पोलीस अधिकारी यांनी त्यांचे आभार मानले.

वैभववाडी बाजारपेठत रंगकाम ची कामे करणाऱ्या हरिश्चंद्र रामकुमार राव या मजुराचे पाकीट हरवले होते. त्यामध्ये 13400 इतकी रक्कम होती. ते पाकीट वैभववाडी व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष, भाजपा पदाधिकारी रत्नाकर कदम यांना सापडले. त्यांनी ते प्रामाणिकपणे पोलीस ठाणे येथे आणून जमा केले. दरम्यान हरिश्चंद्र रामकुमार राव यांनी पोलिस ठाण्यात जाऊन सदर पाकिट आपले असल्याचे पोलिसांना सांगितले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी ते पाकीट हरिश्चंद्र राव यांच्या स्वाधीन केले.

रत्नाकर कदम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री अवसरमोल यांनी त्यांचा सत्कार केला.