वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २०२५
चिपळूण — :कोणतेही काम करा पण उत्कृष्टपणे करा असे मत हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले. ते भक्तश्रेष्ठ कमलकरपंत वालावलकर रुग्णालय – सावर्डे येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी या ठिकाणी १५ वर्षांपूर्वी देखील आलो होतो. “श्री क्षेत्र डेरवण हे विविध प्रकारे विकसित झालेले आहे. जरी सर्व काही बदलले असले तरी येथील श्री क्षेत्राचा हेतू बदलला नाही”. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले “कोणतेही काम करा पण उत्कृष्टपणे करा” हे सांगताना त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले रुग्णालया कडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट वैद्यकीय सोयी- सुविधा, येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सर्वांचे भरभरून कौतुक केले.
वालावलकर रुग्णालय मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, स्पोर्ट्स अकॅडेमीची, तसेच त्यांनी न्युक्लिअर मेडिसीन , लीनियर एक्सीलरेटर विभागाला त्यांनी भेट दिली. वार्षिक स्नेहसंमेलनांची सुरवात श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
ह्या कार्यक्रमात संस्थेचे हितचिंतक आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी मार्ग दाखविणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा, समाज सेवकाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संगमेश्वर चे संजय शिंदे, मार्गताम्हाणेचे मनोहर चव्हाण, खेडचे सुरेश पवार, जळगावचे संदीप देसाई, दापोली चे किरण पावसे, शृंगारतळीचे कासम सालेह, विश्वस्त मैत्री ग्रुप पोलादपूर चे उदय खरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या शैक्षणिक यशासाठी गौरविण्यात आले. विविध प्रकारच्या सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून केले गेले.












