चिपळूण | प्रतिनिधी : उपलब्ध माहितीनुसार चिपळूण कराड रोड वर तिहेरी अपघात झाला असून त्यात तब्बल ५ जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.
परराज्यातील पासिंग असलेली थार, रिक्षा आणि ट्रक यांच्यात पिंपळी येथे हा अपघात झाला.
थार चालकाने रिक्षा आणि ट्रकला ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे
अपघाताची भीषणता इतकी होती की जागीच चार जण ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला
या अपघातात मृत्तांमध्ये रिक्षातील चार जण तर थार चालकाचा समावेश
थार चालकाने रिक्षाला पाठीमागून धडक दिली
रिक्षामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे













