रत्नागिरीकरांच्या उदंड प्रतिसादात यशस्वी ठरला उत्तरायण 2025- फूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निवल

इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित “उत्तरायण 2025-फूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निवल” दिनांक 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी जयेश मंगल पार्क, माळनाका, रत्नागिरी येथे उदंड प्रतिसादात संपन्न झाला. 24 जानेवरीला कार्यक्रमाची सुरवात दिमाखदार सोहळ्यात अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड मॅडम, सोनाली कदम मॅडम आणि शोभना कांबळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बहुसंख्य रत्नागिरीकरांच्या साक्षीने झाली. त्याच दिवशी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत समस्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती लाभली.

एकूण ५७ स्टॉल्स आणि १२ फ़ूड स्टॉल्स सोबत सुरू असलेल्या उत्तरायण २०२५ ला सर्व स्तरातून समस्त रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. दररोज हजारो रत्नागिरीकरांनी भेट देऊन खरेदीचा आणि अस्सल चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि सर्व महिला उद्योजकांना भरभरून प्रोत्साहन दिले. सामाजिक कार्य करणाऱ्या आविष्कार संस्थेला देखील विनामूल्य स्टॉल देण्यात आला आणि त्यांना छान प्रतिसाद मिळाल्याबद्दल संस्थेने आभार मानले.

संध्याकाळी लहान मुलांचे डान्स शो, कार्टून कॅरॅक्टरची धमाल, लकी ड्रॉ, फनी गेम्स अशी धमाल होती. आलेल्या मान्यवरांचे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले. ओसवाल डिझाईन यांच्यामार्फत बक्षीस वितरित करण्यात आली. कार्यक्रमाला जे.एस.डब्लू एनर्जी लिमिटेड, मनहा इंटरनेशनल ब्रँडेड सायकल अँड टॉयस्, सन्माननीय निमेशजी नायर साहेब, आहार होटल, होटल मेजवानी, प्रवीण ट्रेडर्स, के.एस. पोवार बिल्डर्स, स्वानंद ज्वेलर्स, पंजाब नेशनल बँक, रोटेरियन रुपेशजी पेडणेकर साहेब, साक्षी फूड्स तसेच लक्ष्मी इंफ्रास्ट्रक्चरचे गणेश जोशी साहेब यांचे प्रायोजकत्व लाभले.

सर्व स्टॉल धारकांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असून नवीन उद्योगिनींनी हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचा आणि आपला व्यवसाय उत्तम नफ्यात झाल्याने आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी आणि रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊनचे दादा कदम, बिपिनचंद्र गांधी, डॉ. वामन सावंत, केदार माणगावकर, गणेश जोशी, प्रवीण लाड यांनी मोलाची मदत केली आणि प्रोत्साहन दिले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या रोटेरियननी देखील आपली उपस्थिती नोंदवली आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीतील अनेक नामवंत व्यक्तींनी उत्तरायण 2025 ला भेट देऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सर्व स्टॉल धारकांना देखील खरेदी करून मदत केली.

इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनची पूर्ण टीमने पहिल्याच वर्षी हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. तसेच इवेंट चेअरमन सौ. तन्वी तुषार साळुंखे आणि इवेंट को-ऑर्डिनेटर डॉ. प्रियांका मयूर कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच रोटेरियन डॉ. संदीप करे सर यांनी संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पदोपदी मार्गदर्शन करून मोलाची साथ दिली. इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यापुढे देखील असेच नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवेल असे प्रतिपादन क्लबच्या अध्यक्ष डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी केले आणि समस्त रत्नागिरीकरांचे आणि प्रायोजकांचे आभार मानले.