खेड(प्रतिनिधी)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी (क्रीडा,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक)या संस्थेच्या वतीने दिव्यांग खेळाडूंच्या प्रोत्साहना साठी ७ जानेवारी २०२४ रोजी खेड येथील क्रीडा संकुल मैदान येथे दिव्यांग खेळाडू नोंदणी व एक दिवशीय क्रिकेट मार्गदर्शन सराव शिबिर व क्रिकेट निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे
फेब्रुवारी २०२४ मध्ये रत्नागिरी येथे होणाऱ्या कोकण चषक २०२४ या दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धे साठी रत्नागिरी जिल्ह्यातील अस्थिव्यंग,कर्णबधिर,मूक बधिर व्हीलचेअर वापर करणाऱ्या खेळाडूं साठी हे शिबीर होणार आहे
.या शिबिरा मधून दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या जिल्हा संघा साठी खेळाडू व संघ निवड करण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी अपंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र ,युनिक आयडी कार्ड ,आधार कार्ड,लिव्हिंग सर्टिफिकेट,अथवा बोनफाईड प्रमाणपत्र यांची झेरॉक्स पासपोर्ट साईज दोन फोटो खेळाडू नोंदणी प्रवेश फी १०० रुपये व खेळाच्या ड्रेस वर स्वतःच्या जबाबदारीने ७ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ठीक ८ वाजता क्रीडा संकुल खेड येथील मैदानात उपस्थित राहावे.
उपस्थित रहाणाऱ्या खेळाडूंनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यत आपण सहभागी होत असल्याची नोंद करणे आवश्यक आहे.या संदर्भात अधिक माहिती करीता.आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक क्रीडा मार्गदर्शक श्री.प्रशांत सावंत संपर्क क्रमांक ८३८०८३७५००या क्रमांका जवळ संपर्क करावा.असे आवाहन दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.









