धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधात तिसऱ्या दिवशीही स्थानिक ग्रामस्थांचे आमरण साखळी उपोषण सुरूच

उपोषणाला तालुका स्तरातुन पाठींबा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची उपोषणस्थळी भेट

अनधिकृत मदरशावर कारवाईची मागणी

 

भाजपा पक्ष उपोषण कर्त्यांच्या ठामपणे पाठिशी

 

राजापूर (प्रतिनिधी): शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २६ जानेवारी पासून सुरू केलेले आमरण साखळी उपोषण मंगळवाली सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला असून या उपोषणाला धोपेश्वर गावाबरोबरच या पंचक्रोशीसह तालुक्यातुन आता वाढता पाठींबा मिळू लागला आहे. मंगळवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजापुरा येत उपोषणस्थळी भेट देत उपोषण कर्त्यांशी चर्चा केली व उपोषणात सहभागी होत अनधिकृत मदरशावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

 

भाजपा पुर्णपणे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत सावंत यांनी यानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन यावर तातडीने तोडगा काढावा व अनधिकृत मदरसा बंद करावा अशी मागणीही केली आहे.
मात्र मदरशा सारख्या संवेदनशिल विषयावर आमरण साखळी उपोषण सुरू असतानाही स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने लक्ष घालुन कोणताही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करतेय काय असा सवाल आता उपोषण कर्त्यांसह राजापूर वासीयांतुन उपस्थित केला जात आहे.
पन्हळेतर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत, तसेच धार्मिक तेढ वाढविणारा विषय असून सदरहू मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थानी यापुर्वीच केलेली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्याने व अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्याने रविवार दि. २६ जानेवारी २०२५ पासून अमोल सोगम यांसह स्थानिक ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरु करण्यात केले आहे.

 

रविवारपासून सुरू झालेल्या या आमरण साखळी उपोषणात स्थानिक ग्रामस्थांसह अमोल सोगम,पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर आदीसंसह स्थानिक ग्रामस्थ व महिलावर्गही मोठया संख्येने सहभागी झाला आहेतर भाजपासह शिवसेना, उ. बा. ठा या पक्षांनीही या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उपोषणस्थळी हजेरी लावत उपोषणात सहभाग घेतला. मंगळवारी तिसऱ्या दिवशी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रात नरेंद्र मोदी व राज्या देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे, आंम्ही अनधिकृत बाबी खपवून घेणार नाही असा ईशारा देत भाजपाच्या राज्यात आंम्हाला अनधिकृत मदरशा विरोधात आंदोलन व उपोषण करावे लागत आहे याची खंत असल्याचे नमुद केले. भाजपा पुर्णपणे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मंगळवारी उपोषणस्थळी पुन्हा एकदा भाजपा महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ.सुयोगा जठार, शीतल पटेल, मोहन घुमे ,कोषाध्यक्ष विवेक गुरव, धनंजय मराठे, संदेश विचारे, शिवसेनेचे रवींद्र बावधकर, शिवसेना उ. बा. ठाकरे गटाचे तालुका प्रमुख कमलाकर गुरव, संदीप चव्हाण, अनिल कुडाळी यांसह हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, निकेश पांचाळ विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दीलीप गोखले आदिसह रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले होते.

 

या उपोषणाला धोपेश्वर गावातील स्थानिक ग्रामस्थांसह मंगळवारी या पंचक्रोशीतील अनेक गावांतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपला पाठींबा दर्शविला. तर आता राजापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांतुनही विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटना यांनीही या उपोषणाला पाठींबा देण्याचा निर्धार करत हे उपोषण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
फोटो 28 आरजेपी 2
राजापूरातील धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशा विरोधात सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या आमरण साखळी उपोषणाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मंगळवारी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व भाजपाचा पाठींबाही जाहिर केला.