खेड (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई योगेश कदम यांनी नवरात्र उत्सवानिमित्त वरवली देऊळवाडी येथील सोमजाई मंदिराला भेट देत दर्शन घेतले. या निमित्ताने परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.
श्रद्धेने भाविक दर्शनासाठी दाखल झाले असताना, श्रेया वहिनींच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. मंदिर परिसरात महिला जिल्हाप्रमुख सुप्रियाताई पवार, महिला तालुकाध्यक्ष मुग्धा भोसले, महिला आघाडी प्रमुख दर्शन ताई मोरे, विभाग प्रमुख महिपत घोलप, महिला विभाग प्रमुख रेखा चव्हाण, सरपंच प्राजक्ता यादव, माजी सरपंच अनिता यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाखाप्रमुख दीपक यादव, बाळकृष्ण पवार, अनंत यादव, माजी उपसरपंच प्रदीप यादव यांनी श्रेया वहिनींचे मनःपूर्वक स्वागत केले. सरपंच प्राजक्ता यादव यांनी त्यांचा सत्कार करून मानाचा सन्मान केला.
गावातील महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात श्रद्धा व उत्साहाने सहभाग घेतला. सोमजाई मातेसमोर करण्यात आलेली ही भेट केवळ धार्मिकतेचा अनुभव देणारीच नव्हे, तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली.











