राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका बार असोसिएशनचे ६ वे फॅमिली गॅदरिंग यावेळी वारगाव येथील सिवाई रिसॉर्ट येथे पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ वकिल अड. प्रकाश रानडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यांनतर राजापूर तालुका बार चे अड. शशिकांत सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
त्यानंतर विविध वकिलांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये अड. अभिषेक ढवळे, अड. मंदार हर्डीकर, अड. सुशांत पवार, अड. शशिकांत सुतार, अड. पराग मोदी, अड. जमीर खलिफे, अड. श्री व सौ. राहुल राणे, यांनी जुनी नवी गिते सादर केली.
तसेच अड. प्रशांत पाध्ये व डॉ. सौ. तृप्ती पाध्ये यांनी तो व ती हा कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाण अड. यशवंत कावतकर व अड. पराग मोदी यांनी मनोरंजनात्मक नाटय सादर केले.
तसेच अड. चंद्रशेखर अभ्यंकर व सौ. देवस्थळी यांनी कविता सादर केल्या. अड. सुनिल मेस्त्री यांनी ताज्या घडामोडीचा आढावा घेत बातमीपत्र सादर केले. त्याला सर्व वकिलांनी दाद दिली. तसेच यावेळी राजापूर तालुका बार असोसिएशनतर्फे बारमधील ज्येष्ठ विधीज्ञ अड. प्रकाश रानडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेज ज्येष्ट विधिज्ञा अड. सौ. स्वाती वालावलकर यांचा देखील स्मृती चिन्ह व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अड. मिलिंद चव्हाण, अड. स्वप्नील सावंत, अड. समीर कुंटे, अड. राजन देवरूखकर, अड. महेश नकाशे, अड. कपिल राणे, अड. मोरे, अड. निखिल तेरवणकर, अड. तन्मय सिनकर, अड. अभिजीत अभ्यंकर, अड. अविनाश कुवेसकर, अड. प्रविण नागरेकर, अड. सुशांत पवार, अड. सौ. स्मिता रानडे, अड. दिलनवाझ वस्ता, अड. रोझिना खोपेकर, अड. तेजस्विनी राणे, अड. प्राची मराठे, अड. सुनैना देसाई, अड. अर्चना पाटील, अड. प्रमिला शेटये, अड. सारिका लोळगे, अड. तृप्ती कांबळे, अड. एकनाथ मोंडे, अड. गुरूदत्त खानविलकर उपस्थीत होते.











