मलकापूर येथे ‘भीम – ज्योती समरसता पर्व’ निमित्त रक्तदान शिबिर उस्ताहात संपन्न…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: जिल्ह्यातील मलकापूर येथे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(ABVP) कोल्हापूर ग्रामीण व ‘स्टुडंट्स फॉर सेवा’ यांच्या संयुक्त विद्यमाने नरहर मंदिर मलकापूर येथे ‘भीम ज्योती समरसता पर्व’ निमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सौरभ गजानन खोत व श्रेयस चिकुर्डे उपस्थित होते.श्रेयस चिकुर्डे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत कार्याचा आढावा दिला.या शिबिरात ‘तुमचे रक्त कोणाचे तरी प्राण हेच खरे मानवतेचे दान!’ या संदेशातून समाजात समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.सकाळी दहा ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले.या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष रश्मी कोठावळे,नगरसेविका नीलम लगारे,पल्लवी पवार,सुरेखा घाटगे, गीता पाटील, नेहा नागवेकर, रमेश चांदणे, मधुकर लाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे, पत्रकार विकास कांबळे, रोहित पास्ते यांची उपस्थिती होती. रक्त संकलनासाठी ‘अंकुर ब्लड सेंटर निपाणी’यांचे सहकार्य लाभले. प्रत्येक रक्तदात्याला सन्मानपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच रक्तदानापूर्वी तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आणि सहभागींसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. रश्मी कोठावळे,मधुकर लाड, प्रवीण प्रभावळकर, रमेश चांदणे, सुरेश कोरडे,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक कार्य सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी केले.