नवाबाग येथे माघी गणेश जयंती उत्सव : विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :नवाबाग बायुला घुमटेश्वर मंदिर येथे नवाबाग ग्रामस्थांच्या वतीने येथे दि. १ व २ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणपती पूजना सह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सलग आठ वर्षे होत असलेल्या या उत्सवामध्ये शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने श्री गणरायाचे जल्लोषात आगमन, सकाळी ७ वाजता श्री गणपती पूजन, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायं. ४.०० वा. सुश्राव्य भजन श्री देवी सातेरी महिला वारकरी भाजन मंडळ, अणसुर, सायं. ५.०० वा. सुश्राव्य भजन श्री देव रामेश्वर महिला भजन मंडळ वेंगुर्ले, सायं. ७.०० वा. नवाबाग ग्रामस्थ यांची संगीत आरती, ८.०० वा. लकी ड्रॉ कुपन स्पर्धा आणि रात्री ९.३० वाजता नटराज प्रॉडक्शन प्रस्तुत तुळशीदास दिग्दर्शित नृत्य, हास्य विनोद असणारा “कलाविष्कार” कार्यक्रम सादर होणार आहे.

तर रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.००वा. काकड आरती, सका. ७ वा. श्री गणपती पूजन व आरती, सका १०.०० वा. नवाबाग ग्रामस्थांचे वारकरी भजन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, दुपा. ३.०० वा.स्थानिक महिलांची फुगडी व हळदी कुंकू समारंभ आणि सायं. ६ वा. विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.