पेडणे l प्रतिनिधी :पेडणे – आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्री गणेश जयंती निमित्त शनिवार १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त रात्री ९.३० वा. वसंत जाधव लिखित आणि उमेश आगरवाडेकर दिग्दर्शित ‘देवता’ हे सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे
तत्पूर्वी, आगरवाडा गावातील दिवंगत आणि ज्येष्ठ नाटय कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किशोर नाईक गावकर, मांद्रे माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक उपस्थित राहणार आहेत.
या सत्कार मूर्तीमध्ये स्व. संतोष श्रीधर चोडणकर, स्व. दामोदर श्रीधर दामाजी, स्व. जनार्दन नामदेव नाईक (मरणोत्तर) तर आनंद महादेव कोरगावकर, अनिल विठोबा राऊत, राजेंद्र घनश्याम नाईक, दिगंबर जगन्नाथ
मसुरकर, रामनाथ सदाशिव बगळी, रमाकांत अर्जुन राऊत, प्रभाकर सीताराम नागवेकर, उमेश महादेव आगर वाडेकर (नाट्यलेखक) आदींचा समावेश आहे.
देवता नाटकात भिंगा हाडकी, विठोबा बगळी, गौरेश बगळी, मंगेश फडते, उल्हास नागवेकर, अमोल राऊत, भालचंद्र मांद्रेकर, सुदन नाईक, आनंद नाईक, महेश परब, अरविंद परब, सौ. निवेदिता चंद्रोजी आदी कलाकारांनी सहभाग घेतला आहे.











