खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक 21 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत संपन्न होणार 

वेगुर्ला l प्रतिनिधी :खानोली गावच्या वतीने श्री देव रवळनाथ रंगमंचावर दशावतार कलाक्षेत्रात आघाडीच्या दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य महोत्सव दिनांक 21 एप्रिल ते 27एप्रिल या कालावधीत खानोलीत संपन्न होणार आहे.

कोकणची लोककला असलेल्या दशावताराचा वारसा जपणारा आणि कलेला नवे व्यासपीठ देणारा नाविन्यपूर्ण दशावतारी नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा २१ एप्रिल रोजी संपन्न होणार असून या महोत्सवाचे पहिले नाट्य पुष्प सागरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरे ,दुसरे नाट्य पुष्प दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग.त्यानंतर आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड. चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आरवली

आणि समारोपीय नाटकं खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली हे सादर करणार आहेत‌

या महोत्सवाच्या निमित्ताने एका भव्य लकी ड्रॉ चे आयोजन केले असुन सात दिवस चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात समारोपीय दिवशी लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेत्यांचा बक्षीस वितरण सुद्धा त करण्यात येणार आहे

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लोकप्रिय व्यक्तीमत्व श्री. विशाल प्रभाकर परब तर रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुनिलजी (बंधू साहेब) मयेकर, याच सह सौ. वेदिका विशाल परब,श्री. राकेश धर्णे शासकीय लेखापरिक्षक,श्री. प्रसन्ना (बाळू) देसाई जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग

श्री. राजन गिरप नगराध्यक्ष वेंगुर्ला,श्री. सुहास गवंडळकर उपनगराध्यक्ष,श्री. अवी (दत्ताराम) दुतोंडकर सरपंच वायंगणी,श्री. विजय वासुदेव नाईक जि. प. सदस्य,श्री. भालचंद्र केळुसकर भजनी बुवा , जेष्ठ रंगकर्मी संतोष रेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या पौराणिक नाट्य महोत्सवासाठी नाट्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर आणि इतर सर्व व्यवस्थापकासह खानोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे