श्री दत्तावधूत मठ निखरे येथे श्री अनघादत्त गुरु प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजप्रासून प्रारंभ

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील श्री दत्तावधूत मठ निखरे येथे दि. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत श्री अनघादत्त गुरु प्राणप्रतिष्ठापना सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र नृ‌सिंहवाडी येथील श्री बाळासाहेब गोविंद आलासकर गुरुजी आणि ब्रह्मवृंद यांच्या मंत्रघोषात श्री अनघादत्त गुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सायं. वा. उदक शांती व रक्षोघ्न होम, रात्री ९ वा. गजर दत्तनामाचा (विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ – मांडुकली), शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. प्रायश्चित्त विधी, पुण्याहवाचन, आचार्यवटण, वास्तुमंडल, बम्हादिमंडल, योगिजीमडल स्थापना सायं ५ वा उत्सवमूर्ती मिटवणूक, जलाधीवास, धान्याची वास, शय्यावास, रात्री ८ वा. बुवा भगवान लोकरे विरूध्द बुवा बाबाजी कानडे डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.

 

रविवार २ फेब्रुवारी सकाळी ८ वा. अग्निस्थापना, नवग्रहस्थापना, वास्तुहोम, शांतीहोम, पर्याय होम तर रात्रौ ८ वाजता अजीत गोसावी प्रस्तुत रामचंद्र म्हणे हा संगीत कार्यक्रम होणार आहे.
सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. श्री अनघादत्तगुरु मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, महापुजा, महाआरती, महाप्रसाद तर रात्रौ राजन शंकर कोठारकर लिखित व दिग्दर्शित श्री स्वामी चरीत्र नाटक ‘अनंतकोटी’ सादर होणार आहे.
तरी या मंगल प्रसंगी भाविकांनी उपस्थीत राहून दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी आणि परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.